संगमेश्वर : उमरेसह १० गावांना टॅंकरने पाणी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 येथे टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा.

संगमेश्वर : उमरेसह १० गावांना टॅंकरने पाणी द्या

संगमेश्वर: येथील उमरे धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या १० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येत्या २ दिवसांत या १० गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या रचना महाडिक यांनी केली आहे. धरणाची फरशीकडील (जेथून सांडपाणी जाते, पाण्याचा विसर्ग होतो) भिंत पूर्ण नादुरुस्त झाल्याने येत्या पावसाळ्यात धरणाखालील गावांना धोका निर्माण झाला आहे.

या धरणातील पाणीसाठा चार दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता कमी केल्याने सुमारे दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या धरणामधून उमरे प्रादेशिक नळपाणी योजना राबवली गेली असल्याने अचानक पाणीसाठा कमी केल्याने पुढील दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होईल, असे सांगितले जात असल्याने दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

संबंधित गावांची पाहणी करावी

उमरे, कळंबस्ते, हाकरवणे, भीमनगर, मलदेवाडी, भेकरेवाडी, कोंडउमरे, फणसवणे, अंत्रवली आदी गावे या योजनेवर अवलंबून असून, या गावांना पाण्यासाठी कोणताही पर्याय नाही. त्यामुळे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तातडीने संबंधित गावांची पाहणी करून तसा अहवाल सादर करावा आणि या गावांसाठी टॅंकरची व्यवस्था करावी, अशी मागणी महाडिक यांनी केली आहे.

Web Title: Sangameshwar Water Tanker 10 Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RatnagiriKokanwaterSakal
go to top