
-अतुल पाटील
सांगली : गेल्या सहा महिन्यांत शहरातील रस्त्यांवर एका पाठोपाठ एक अशी पाच ठिकाणी भगदाडं पडली. ती बुजवता-बुजवता महानगरपालिकेच्या नाकी नऊ येत आहे. आतापर्यंत तीन भगदाडे बुजवली; दोन बाकी आहेत, ती बुजवायला आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. गंभीर बाब म्हणजे एक भगदाड बुजवायला एक महिन्याचा कालावधी आणि अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचा खड्डा महापालिकेच्या तिजोरीत पडतो आहे.