
सांगली : ‘थर्टीफस्ट’ म्हटलं की, सरत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे उत्साही स्वागत, तरुणाईकडून शहराबरोबरच ग्रामीण भागातही माळरानांवर पार्टीचा बेत, या बाबी नित्याच्याच. यंदा नववर्षाच्या स्वागताची रंगत पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बार चालकांना पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला भेसळीच्या दारूवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसेच हुल्लडबाजांवर चाप लावण्यासाठी पोलिस दल ‘अलर्ट’ मोडवर आले आहे.