Gram Panchayat Corruption : सांगलीत ACB चा मोठा दणका! 95 हजारांची लाच मागणारी महिला ग्रामविकास अधिकारी अन् लिपिकावर गुन्हा दाखल, गुंडेवाडी ग्रामपंचायतीत खळबळ

Sangli Gram Panchayat bribery case 2026 : गुंडेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रलंबित बिलासाठी 95 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सांगली एसीबीने महिला ग्रामविकास अधिकारी आणि लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Why did Sangli ACB register a bribery case?

Why did Sangli ACB register a bribery case?

esakal

Updated on

एरंडोली (सांगली) : गुंडेवाडी ग्रामपंचायतीला लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याचे बिल काढण्यासाठी ९५ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महिला ग्रामविकास अधिकारी आणि कार्यालयातील लिपिकावर गुन्हा दाखल केला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई (Gram Vikas Officer ₹95,000 bribe demand in Sangli) केली. ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम (वय ४०, रा. खटाव) आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले (४० रा. गुंडेवाडी), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com