
सांगली : कृषी ची महिलांसाठी राखीव योजना
सांगली : महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात स्थान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात विविध कृषी योजनांचा लाभासाठी ‘लक्ष्मी’ योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावावे, असे आवाहन राज्य सरकारने नुकतेच केले आहे. विशेष म्हणजे, महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत.
या योजनांचा लाभ व महिलांच्या सन्मानासाठी ‘लक्ष्मी’ योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावावे, असे आवाहन केले आहे.
निर्णय प्रक्रियेत २० वर्षांपूर्वी महिलांचे नगण्य असणारे प्रमाण वाढतांना दिसत आहे. कृषि महाविद्यालयामंध्ये देखील शिक्षण घेण्यात महिलांचे प्रमाण सध्या वाढले आहे. पंरतु केवळ १४ टक्के महिलांच्या नावावर शेती असल्याने बँकेचे कर्ज, विविध शासकीय योजनांच्या लाभापासून त्या वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील महिलेचे नाव सातबाऱ्यावर लावावे,असा हेतू आहे.
कृषी क्षेत्राच्या विविध बाबींसाठी निर्णय घेतांना महिलांचा समावेश खूप आवश्यक असल्याचे राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या एका महिला शेतकरी परिसंवादात स्पष्ट झाले होते. स्वत: निर्णय घेतल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून त्या शेतीमध्ये अधिक जोमाने काम करतात.
महिलांचा सहभाग वाढल्यास शेतीमधील निव्वळ नफ्यामध्ये वाढ होईल. पिकाच्या गुणवत्तेत वाढ होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होईल, असा आशावादही आहे.
हळद व कापूस वेचतांना महिला शेतमजुरांना हाताला जखमा होऊ नये यासाठी हातात मोजे व शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली पिशवी देण्याबाबतही प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. कमी वेळेत अधिक व चांगले काम कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षण महिला शेतमजुरांना देण्याचे नियोजन आहे.
आता नव्याने ‘कृषी ताई’
कृषी मंत्री दादासो भुसे यांनी एका कार्यक्रमांत सांगितले आहे की, शेतीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी पोकरा योजनेमध्ये चार हजार गावांमध्ये ‘कृषी मित्र’ऐवजी ‘कृषी ताई’ची नेमणूक केली आहे. गेले दोन वर्ष कोरोना संकटाला आपण सामोरे जात होतो. पण त्याकाळात सर्व बंद असतांना शेती व शेतीकामे सुरू होती. कोरोनाकाळात शेतकरी कुटुंबाच्या कष्टाने कुणाला भाजीपाला,धान्य, दुधाची कमतरता जाणवली नाही. त्यामुळे शेतकरी राजा हा कणा आहेच त्याबरोबरच अन्नदेवताही असल्याचेही भुसे यांनी सांगितले.
‘परस’बागेचा विकास
आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी राजा सर्व जगाच्या पोटाची काळजी घेतो. मात्र, त्याचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतांना दिसते. त्यामुळे शेतकरी कुंटुबांने स्वत:च्या कुंटुंबियासाठी स्वत:च्या शेतात पाच ते दहा गुंठ्यात परस बाग विकसित करावी.
Web Title: Sangli Agriculture Reserved Scheme Women
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..