सांगलीच्या वार्षिक आराखड्यासाठी जयंत पाटलांची बैठक, यंदा ३५९ कोटींचे बजेट

पालकमंत्री पाटील : ६० टक्के निधी खर्च, उर्वरित निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश
district planning committee sangli
district planning committee sanglisakal

सांगली : जिल्हा वार्षिक योजना (sangli District Annual Plan)सन २०२१-२२ चा आराखडा ४०४ कोटी ७९ लाखांचा आहे. यंदाच्या आराखड्यातील यंत्रणांनी यातील ६० टक्के म्हणजे २४०.३५ कोटींचा निधी खर्च केला. उर्वरित निधी वेळेत खर्च करण्यासाठी योग्य ‍नियोजन करा, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील (Guardian Minister Jayant Patil) यांनी दिले. सन २०२२-२३ साठी जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा निधी ३५९.२२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. डीपीसीतील(PDC) सर्वसाधारण सन २०२१-२२ अंतर्गत ७.५६ कोटींच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.

district planning committee sangli
रत्नागिरी : शासकीय कार्यालयांना महावितरणचा झटका

जिल्हा नियोजनची (district planning committee)ऑनलाईन बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम(minister vishwajeet kadam), महापौर दिग्वीजय सूर्यवंशी, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी(collector abhijeet choudhari), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. ऑनलाईनद्वारे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार संजय पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत तसेच समिती सदस्य अजितराव घोरपडे, पृथ्वीराज पाटील, देवराज पाटील, दिगंबर जाधव, रमेश पाटील, अरुण बालटे, रवी तमणगौडा पाटील, जयश्री पाटील, अभिजित पाटील, अनिल डुबल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य, सर्व कार्यान्वयीन यंत्रणा आदी उपस्थित होते.

district planning committee sangli
रत्नागिरी : वणौशीतर्फे नातूमध्ये घरात ३ महिलांचे मृतदेह

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘रोजगार हमी योजनेचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील रस्ते, पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करावीत. डीपीसीतील बिलो टेंडरमधून बचत झालेल्या निधीतून कामे सुचवावीत. पर्यटनाला चालना देण्यासाठी चांदोली येथे प्राण्यालयास ब्रिडिंगसाठी वन विभागाने प्रस्ताव सादर करावेत. नदी पात्रातील बाहेर पडणाऱ्या मगरींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍जित कदम(Minister of State for Co-operation and Agriculture Dr. Vishwajit Kadam) यांनी सुखवाडी-तुंग पुलाच्या कामाबाबत यंत्रणेकडे विचारणा केली. कुंडल ते ताकारी रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे यासाठी यंत्रणेने सातत्याने पाठपुरावा करावा, असे आदेश दिले. वाळवा तालुक्यातील मौजे ओझर्डे येथे आरोग्यविषयक सेवा सुविधांचे बळकटीकरण करणे व आरोग्यविषयक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली.

११ प्राथमिक, ७५ आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी

(development)सन २०१९ चा बृहत्‌ आराखडा व सन २०२१ मधील नवीन ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ७५ उपकेंद्रांना मंजुरी दिली. जत तालुक्यातील कुल्लाळवाडी, सिद्धनाथ, पांढरेवाडी, भिवर्गी, गुड्डापूर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी, शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे येथे स्थलांतरित करणे, शिराळा-१ चे कापरी येथे, शिराळा-२ चे औंढी येथे, भिलवडीचे माळवाडी येथे, जत-१ चे अचकनहळ्ळी येथे, जत-२ चे तिप्पेहळ्ळी येथे, जत-१ चे अमृतवाडी येथे, जत-१ चे देवनाळ येथे व कवठेमहांकाळचे बोरगाव येथे आरोग्य उपकेंद्र स्थलांतरित करणे, आष्टा येथील ग्रामीण रुग्णालय(hospital news ) ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणे, ग्रामीण रुग्णालय कासेगाव येथे मंजूर करणे, जत तालुक्यातील बेवनूर येथील म्हसोबा मंदिर देवस्थानास क वर्ग दर्जा ‍मिळणे आदींना मंजुरी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com