Ratnagiri Mahavitran News : शासकीय कार्यालयांना महावितरणचा झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahavitaran

सर्कल, तलाठी कार्यालयाची वीज तोडली; कार्यालयात अंधार, २२ हजार ३७० ची थकबाकी

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांना महावितरणचा झटका

रत्नागिरी : वीज बिल थकविणाऱ्या शासकीय कार्यालयांना महावितरण कंपनीने(MSCB) झटका दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या(collector office ratnagiri )आवारात असलेल्या सर्कल आणि तलाठी कार्यालयाचे २२ हजार ३७० रुपये वीज बिल थकले आहे. याबाबत १५ दिवसाची आगावू नोटीस देऊन देखील बील न भरल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा(Power supply) खंडित केला आहे. त्यामुळे आज सकाळी अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना अंधारात बसण्याची आणि मोबाईल टॉर्चचा (battery) वापर करून काम करण्याची वेळी आली.

हेही वाचा: रत्नागिरी : वणौशीतर्फे नातूमध्ये घरात ३ महिलांचे मृतदेह

महावितरण कंपनीने वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांविरोधात जारदार मोहिम आखली आहे. त्यानुसार नोटीस बजावूनही वीज बिल नभरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत वीज जोडणी तोडली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील(collector office ratnagiri) सर्कल आणि तलाठी कार्यालयाचेही वीजबील थकीत आहे. याबाबत महावितर कंपनीने त्यांना नोटीन देऊन १५ दिवस आगावू सूचना दिली होती. तरीही वीज बिल न भरल्यामुळेअखेर महावितरणने सर्कल व तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळउडाली असून अनेकांची ऑनलाईन कामे खोळंबली आहेत.

आज सकाळपासून या कार्यालयातील कर्मचारी मोबाईलवर व मेणबत्तीच्या उजेडात काम सुरू केले आहे. १७ डिसेंबर २०२१ ची थकबाकी२२ हजार ३७० रुपये आहे. ती न भरल्याने महावितरण(mahavitaran) कंपनीने ही कारवाई केली आहे. आपला विद्युत पुरवठा कायदा २००३ चे कलम५६ अन्वये कोणतीही सूचना न देता महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित (Power outage)केला जाईल, असे सर्कल आणि तलाठी कार्यालयावरलावलेल्या नोटीसीमध्ये स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top