पलूस : तुझ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करू, अशी धमकी देऊन तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेऊन आणखी आठ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पलूसच्या पोलिस (Palus Police) उपनिरीक्षकास सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Sangli Anti-Corruption Department) पथकाने सापळा रचून पकडले. महेश बाळासोा गायकवाड असे त्याचे नाव आहे.