सांगली : ३५८ मशिदी, ६३ मंदिरांचे परवान्यांसाठी अर्ज दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhonge

सांगली : ३५८ मशिदी, ६३ मंदिरांचे परवान्यांसाठी अर्ज दाखल

सांगली: जिल्ह्यातील ४९५ मशिदींपैकी ३५८ मशिदींनी ध्वनिक्षेपक परवान्यासाठी अर्ज केले असून ६४ मशिदींना विहित आवाजात ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे ६३ मंदिरांनी अर्ज केले असून २६ मंदिरांना परवानगी दिली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात भोंग्यावरून वातावरण तापले आहे. या पार्श्र्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवाना घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात एकूण ५०८ मशिदी असून त्यापैकी ४९५ मशिदीवर ध्वनिक्षेपकाचा वापर सुरू होता. तर १३ मशिदींवर ध्वनिक्षेपक लावलेले नव्हते. पोलिसांच्या आवाहनानुसार ३५८ मशिदींनी परवान्यासाठी अर्ज केले असून पोलिसांनी आतापर्यंत ६४ मशिदींना परवानगी दिल आहे.

तसेच जिल्ह्यात २५९६ मंदिरे असून त्यापैकी २६३ मंदिरांवरच ध्वनीक्षेपकाचा वापर होत होता. या २६३ पैकी ६३ मंदिरांनी परवान्यासाठी अर्ज केले असून २६ मंदिरांना आजअखेर परवाने दिले आहेत. इतर अर्जांची छाननी सुरू असून त्यांनाही लवकरच परवाने दिले जाणार आहेत. उर्वरीत धार्मिक स्थळांनी ध्वनीक्षेपक परवान्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन यापूर्वीच पोलिस प्रशासनाने केले आहे.

Web Title: Sangli Applications Filed Licenses 358 Mosques 63 Temples

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top