
-हर्षदा गुमास्ते
सांगली : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या सत्तांतरात महिलांनी खऱ्या अर्थाने ताकद दाखवली. आज महिला सर्वच क्षेत्रांत कार्यरत आहेत. बस चालकापासून ते पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत थांबून काम करण्यापर्यंत तिची ताकद आहे. मात्र ही महिला सुरक्षित नाही. तिच्यावर अनेक संकटे आहेत, वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास आहे. त्यामुळेच जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर- २०२४ अखेर ११४ महिलांवर अत्याचार झाले. समाजमाध्यमांतून १ हजार ९०० महिलांची फसवणूक झाली, ही आकेडवारी चिंताजनक आहे.