Bhagyashree Patwardhan Visits Sangli Sansthan Ganpati
esakal
सांगली : प्रख्यात सिनेअभिनेत्री आणि सांगली संस्थानचे राजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या कन्या भाग्यश्री आज अनेक वर्षांनंतर गणेशोत्सवाच्या दिवशी सांगलीत दाखल (Bhagyashree Patwardhan Sangli) झाल्या. त्यांनी दरबार हॉलमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दर्शन घेतले आणि आरती केली. त्यांनी आरती केल्याच्या कारणातून वाद उघड झाला. संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्याशी शाब्दिक चकमक झाली.