Sangli : पाणी योजनेवरून भाजपने जनतेची दिशाभूल करू नये; राष्ट्रवादी आक्रमक

Sangli
Sangli

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : शहराच्या पाणी योजनेसाठी १२३ कोटी रुपये मंजूर करून आणल्याचे सांगून भाजपने जनतेची दिशाभूल करू नये, असे आव्हान आज राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्ष ऍड. चिमन डांगे व माजी नगरसेवक खंडेराव जाधव प्रमुख उपस्थित होते.

Sangli
Mumbai : ३३ लाख झाडे देताहेत मुंबईकरांना प्राणवायू; मुंबईतील वृक्षसंपदेची जागतिक स्तरावरही दखल

ते म्हणाले, "इस्लामपूर शहरातील २४ बाय ७ पाणी योजनेला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना सुरुवात झाली होती. ६ सप्टेंबर २०१४ साली या योजनेला सर्वप्रथम तांत्रिक मंजुरी मिळाली होती. २४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानंतरच्या वर्षभरात सुधारित प्रस्तावालाही मान्यता मिळाली, त्यासाठी ३८ कोटी रुपयांची मान्यता मिळाली होती. नंतरच्या काळात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना या योजनेसाठी पूर्णतः अपयश आले असून ते एक रुपयाही आणू शकले नाहीत.

अमृत २ या सहा सात महिन्यापूर्वी आलेल्या शासनाच्या नव्या प्रकल्प अंतर्गत इस्लामपूरचा प्रस्ताव गेलेला असून त्यासाठी नव्याने तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. ज्यांना ३०० एचपीची मोटार मंजूर असूनही पाच वर्षात आणता आली नाही त्यांनी १२३ कोटी रुपयांची मंजुरी आणल्याचे सांगून इस्लामपूरच्या नागरिकांची दिशाभूल करू नये. २४ बाय ७ पाणी योजना मंजूर करून आणणे ही यांची क्षमता नाही.

Sangli
Devendra Fadnavis: "होय मोदींनी लस तयार केली, कारण..." ; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

२४ बाय ७ हा प्रकल्प २०१४ सालचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळातला आहे. आमचा तेव्हापासून शासनाकडे दावा आहे. आता येणारी योजना पूर्णतः बदललेली असेल. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना माहिती मागितली;परंतु ती अद्याप मिळालेली नाही. तसे असेल तर त्यांनी आणलेली योजना होणार? की अमृत २ मधून गेलेल्या प्रस्तावाच्या अंतर्गत मंजूर असलेली योजना होणार? हे श्रेय घेणाऱ्यांनी जाहीर करावे.

प्रशासक काळात नवा प्रस्ताव गेला आहे, याची माहिती तरी या लोकांना आहे की नाही शंका आहे. हा प्रकल्प कोणी बनवला आहे हेदेखील यांना माहित आहे का? आधी त्यांनी त्याची माहिती घ्यावी आणि पुन्हा श्रेय घ्यावे. नगरपालिका ही खासगी संस्था नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यासाठी मी स्वतःच्या पैशातून अमुक एखादी काम केले असे कोणी सांगू नये." मुख्याधिकारी देखील शहरातील योजनांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.

'ते' २ कोटी कुठे आहेत?

५ फेब्रुवारी २०१८ ला निघालेल्या अध्यादेशात इस्लामपूर शहरासाठी विशेष रस्ता अनुदान अंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर करून आणल्याचा दावा विक्रम पाटील यांनी केला होता. त्यातील एक रुपया देखील यांना अद्याप आणता आला नाही आणि आत्ता १२३ कोटी आणल्याचे नाटक करून हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहाजी पाटील यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com