
सांगली : इंधन खरेदीवर आज बहिष्कार
सांगली : इंधन दरात अचानक कपात केल्याने पेट्रोल पंप चालकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यासह विविध अन्य प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही. त्याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे उद्या (ता. ३१) एक दिवस इंधन खरेदीवर बहिष्कार घालण्यात आला आहे. फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध आणि जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, या आंदोलनाचा परिणाम ग्राहकांना सहन करावा लागणार नाही, असा दिलासा देण्यात आला आहे. संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकात विविध मुद्दा मांडण्यात आले आहेत. त्यानुसार, पेट्रोल, डिझेलची पंपावरील विक्री नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. सन २०१७ पासून पेट्रोल डीलर्स ‘डिलर मार्जिन’ सुधारलेले नाही. २०१७ पासून इंधन दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूक वाढली आहे. त्याचे व्याज, पगार वाढले आहेत. दोन वेळा केंद्राने एक्साईजमध्ये कपात जाहीर केली आहे. त्यामुळे इंधन दरात घट झाली,
मात्र त्याचवेळी जास्त एक्साईज भरून खरेदी केलेल्या इंधनाचे काय? मुदलातही घट झाल्यावर ती सहन कशी करायची? दर कमी करण्यास संघटनेचा पाठींबा आहे, मात्र दरात बदल करण्यासाठी पंधरा दिवसांचा टप्पाच योग्य आहे. अचानक दरबदल करून डीलर्सचे नुकसान होत आहे. त्यामुळे खरेदीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
Web Title: Sangli Boycott Fuel Purchase Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..