CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य
Sangli Students Achieve Remarkable CA Results : मे महिन्यात झालेल्या अंतिम परीक्षेस देशभरातून दोन्ही ग्रुप घेऊन २९ हजार २८६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५४९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची टक्केवारी १८.७५ इतकी आहे.
Sangli’s Streak Continues: 20 Students Shine in Latest CA Resultssakal
सांगली : सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत सांगलीतील २० जणांनी यश मिळवले. मे महिन्यात झालेल्या सनदी लेखापाल फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि अंतिम परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेत गेली काही वर्षे सांगलीतील विद्यार्थ्यांनी यशाचे सातत्य ठेवले आहे.