Sangli : दफनभूमी भूसंपादनात घोटाळा

माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे यांची मागणी
दफनभूमी
दफनभूमी sakal

सांगली : मुस्लिम, ख्रिश्चन दफनभूमीसाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने थांबवावी. ही जागा दफनभूमीसाठी योग्य नाही. भूसंपादनाच्या रकमाही संशयास्पद आहेत. त्यामुळे या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करणार आहे. प्रशासनाने योग्य कार्यवाही न केल्यास; प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करू, असा इशारा माजी आमदार दिनकर पाटील आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला.

ते म्हणाले, ‘‘मुस्लिम, ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी शामरावनगर येथील स. नं. ५०७ मधील जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. ही जमीन दफनविधीसाठी योग्य नसल्याचे आज पाहणीत निदर्शनास आले. जानेवारीत या जागेवर तीन ते चार फूट पाणी आहे.

आत्ताच ही स्थिती असेल तर पावसाळ्यात स्थिती काय होत असेल? त्यामुळे दफनविधीसाठी निश्चित केलेली जमीन ही दलदलयुक्त असल्यामुळे या जमिनीवर दफनविधी झाल्यास मृतदेहाची विटंबना होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जमिनीची पाहणी करून भूसंपादनाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी.’’

भूसंपादनाच्या रकमा संशयास्पद आहेत. सहा एकरमध्ये अनेक गरीब आहेत. त्यांचे वटमुखत्यारपत्र काही नगरसेवकांनी घेतले आहे. त्याची चौकशी करून नावे जाहीर करावीत. महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना महापालिकेच्या तिजोरीवर हात मारण्याचा डाव आखला गेला आहे.

तो हाणून पाडला जाईल, असा इशाराही दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लवकरच भेटणार असून त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करणार आहोत. अमर पडळकर, अजयकुमार वाले, बाळासाहेब बेलवलकर, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲड. विलास बेले, रवींद्र वादवने, अभिमन्यू भोसले, पंडित पाटील, रणजित पाटील, प्रथमेश शेटे, किशोर भडेकर, मुफीत कोळेकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com