Sangli : ‘चांद्रयान-३’ मोहिमेत मिरजेच्या डॉ. कुराडेंचाही सहभाग, प्रक्षेपकांच्या चाचण्यांची सांभाळली जबाबदारी

नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीचे (राष्ट्रीय वांतरिक्ष प्रयोग शाळा) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राजन कुराडे यांनी या चांद्रयानाच्या उड्डाणासाठी वापरलेल्या लॉन्चिंग व्हेईकलची जमिनीवर चाचणी करण्याची महत्त्‍वाची जबाबदारी पार पाडली
Sangli chandryan 3
Sangli chandryan 3 Sakal

सांगली - भारताच्या अंतराळ संशोधनात मैलाचा दगड ठरलेल्या चांद्रयान तीनच्या यशस्वी प्रक्षेपणात राष्ट्रीय वांतरिक्ष प्रयोग शाळेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राजन कुराडे यांचाही महत्त्‍वाचा सहभाग होता. डॉ. कुराडे हे मूळचे मिरजेचे आहेत. भारताच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सांगलीकरांनी गौरवास्पद कामगिरी बजावली आहे.

Sangli chandryan 3
Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस; रस्ते वाहतूक मंदावली

नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीचे (राष्ट्रीय वांतरिक्ष प्रयोग शाळा) वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राजन कुराडे यांनी या चांद्रयानाच्या उड्डाणासाठी वापरलेल्या लॉन्चिंग व्हेईकलची जमिनीवर चाचणी करण्याची महत्त्‍वाची जबाबदारी पार पाडली होती.

डॉ. राजन कुराडे म्हणाले, ‘‘चांद्रयान-३ मिशनचा लँडर २३ ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. परंतु असे सॅटेलाईट (पेलोड) घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारे रॉकेट्सही तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणून त्यांची जमिनीवर चाचणी करणे अत्यंत गरजेचे असते. अशा चाचण्यांसाठी इस्त्रोला इतर संस्थांची मदत लाभते.

Sangli chandryan 3
Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस; रस्ते वाहतूक मंदावली

त्यापैकी एक राष्ट्रीय वांतरिक्ष प्रयोगशाळा ही बंगळूर येथे १९५९ पासून स्थित आहे. ही संस्था विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालय (ज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय) आणि वैज्ञानिक तथा औद्यौगिक संशोधन परीषद यांच्या अखत्यारित येते.

या संस्थेमध्ये १.२ मीटर चौकोनी आकाराचे वायुसुरंग आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या रॉकेट्स, प्रक्षेपक (Launch vehicles), क्षेपणास्त्रे यांच्यावर संशोधन होते. याच वायुसुरंगामध्ये इस्त्रोच्या पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एलव्हीएम-३ अशा अनेक प्रक्षेपकांवर संशोधन झाले आहे.’’

Sangli chandryan 3
Mumbai : पालिका मुख्यालयात एसआयटीची झाडाझडती; विकास नियोजन खात्यासह विभाग कार्यालयांचीही चौकशी

ते म्हणाले, ‘‘इस्रोकडून ते करणार असलेल्या प्रोजेक्टचे डिझाईन आमच्याकडे दिले जाते. त्यावरून या प्रोजेक्टला आवश्यक रॉकेट्सचे हुबेहूब बनवलेल्या छोट्या मॉडेल्सवर वायूच्या गतीमुळे प्रभाव पडणाऱ्या शक्तींचा (दाब, बल) अभ्यास वायुसुरंगामध्ये केला जातो.

हे दाब, बल वापरून या रॉकेट्सची बांधणी इस्त्रो करते. या वायुसुरंगामध्ये वायूची गती ही ७० ते १३६० मीटर प्रती सेकंद (म्हणजे ध्वनीच्या चारपट गती इतकी) नियंत्रित करून हे संशोधन केले जाते. हेच संशोधन करणाऱ्या टीममध्ये माझा सहभाग होता.

इस्त्रोच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी उदाहरणार्थ मिशन मंगळ, चंद्रयान मोहिमा यासाठी लागणाऱ्या लॉन्चिंग व्हेइकल, डीआरडीओची विविध क्षेपणास्त्रे किंवा लढाऊ विमानांच्या चाचण्यांची जबाबदारी आम्ही पार पाडतो. देशसेवेची संधी या माध्यमातून मिळते याचा अभिमान वाटतो.

- डॉ. राजन कुराडे, वरिष्ठ वैज्ञानिक, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी, बंगळूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com