
सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असलेल्या पृथ्वीराज पाटील यांनी आज काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोबतच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा प्रदेशाध्यक्षांना पाठवला. काँग्रेसने सहकारमहर्षी गुलाबराव पाटील यांच्यापासून आजपर्यंत विविध पातळ्यांवर दिलेली साथ आणि संधीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.