esakal | कोरोनाचा कहरच! सांगलीत 1090 रुग्ण तर 19 बाधितांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

null

कोरोनाचा कहरच! सांगलीत 1090 रुग्ण तर 19 बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली. दिवसभरात तब्बल 1 हजार 90 रुग्ण आढळून आले. या लाटेत पहिल्यांदाच रुग्णसंख्येने एका दिवसात एक हजाराचा टप्पा पार केला आहे. त्याहून चिंतेची बाब म्हणून 19 जणांनी आज जीव गमावला आहे. या स्थितीत लोकांनी आता अधिक सावध व्हावे, असे आवाहन पुन्हा-पुन्हा केले जात आहे.

आज जिल्ह्यातील 1832 जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यात 548 जण बाधीत आढळले. 3 हजार 565 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात 585 जण बाधित आढळले आहेत. आटपाडी तालुक्‍यातील 105, जत 102, कडेगाव 80, कवठेमहांकाळ 59, खानापूर 92, मिरज 145, पलूस 56, शिराळा 53, तासगाव 98, वाळवा 97 तर महापालिका क्षेत्रात 203 रुग्ण आढळले आहेत. पैकी मिरज शहरात 68 तर सांगली शहरात दिवसात 135 रुग्णांची नोंद झाली आहे.

कडेगाव तालुक्‍यातील 1, पलूस येथील 1, खानापूर 3, कवठेमहांकाळ 3, मिरज 2, तासगाव 3, वाळवा 2 तर मनपा क्षेत्रातील 4 जणांचा आज मृत्यू झाला. परजिल्ह्यातील 43 रुग्णांची येथे नोंद झाली. सध्या जिल्ह्यातील 8 हजार 331 जण उपचाराखाली आहेत. पैकी 1512 जण गंभीर आहेत. एकूण रुग्णसंख्या 63 हजार 177 वर पोहचली असून एकूण बळी 1 हजार 969 झाले आहेत. सध्या 1264 जण ऑक्‍सिजनवर आहेत. 161 जण व्हेंटीलेटरवर आहेत. इन्व्हेजीव व्हेंटीलेटरवर 12 जण आहेत.

लसीकरणाची स्थिती

जिल्ह्यात आज 10 हजार 772 जणांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यात ग्रामीण भागीत 8 हजार 100 जणांना, शहरी भागातील 1298 जणांना तर महापालिका क्षेत्रातील 1374 जणांना लस देण्यात आली आहे.

Edited By- Archana Banage