

Sangli Electrocution Accident Kupwad MIDC
esakal
Sangli Crane Accident : (ऋषिकेश माने) एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौकात क्रेनमधून साहित्याची वाहतूक करत असताना क्रेनचा हायव्होल्टेज विद्युतवाहिनीला स्पर्श होऊन विजेचा धक्का लागल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १९) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. प्रदीप दिलीप खराडे (वय ४१, रा. यशवंतनगर, कुपवाड) आणि रोहिदास भगवान उत्तरे (वय ३२, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) अशी मृतांची नावे आहेत.