
सांगली : पाटबंधारे विभागातील कर्मचारी महेश मकुंदराव कांबळे यांना वारंवार त्रास देऊन, तसेच जातिवाचक टोमणे मारून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील शामराव चौगुले (वय ४३, रा. विद्यानगर, गल्ली क्र. २, राहुल सिल्व्हर अपार्टमेंट, खोली क्र. ३, वारणाली, सांगली) आणि गणेश प्रकाश जोशी (वय ४५, रा. अयोध्यानगर, साईनाथ पार्क, हरिपूर रस्ता, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.