
Kupwad MIDC Crime : कुपवाड औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्लान्टजवळ उमेश मच्छिंद्र पाटील (२१, रा. कुपवाड) याचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी संशयित साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (वय २४, मूळ रा. बुलढाणा, सध्या रा. बामणोली), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (वय २०, रा. बामणोली) या दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन युवकासही ताब्यात घेतले आहे. कुपवाड औद्योगिक आणि एलसीबीच्या संयुक्त पथकानेही ही कारवाई केली.