
सांगली : बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी विजय बाळासाहेब कोळी (वय ३७, दत्तनगर, कुपवाड) आणि शरद बापू हेगडे (वय ३८, राम रहीम कॉलनी, संजयनगर) या दोघांना साडेचार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याचा निकाल सहायक जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे यांनी दिला. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.