विटा शहरात नवयुवक व कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे शरीर (बॉडी) पिळदार बनविण्याच्या नावाखाली अशा इंजेक्शनचा वापर करून नशा करीत असलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
विटा : कार्वे औद्योगिक वसाहतीत एमडी ड्रग्जचा साठा एलसीबीने जप्त केल्यानंतर खानापूर (Khanapur) तालुक्यात खळबळ उडाली होती. नशेखोरीविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतल्यानंतर आता नशेची इंजेक्शन (Injection) जप्त करण्यात आली आहेत. यामुळे विटा नशेखोरीचा अड्डा बनतोय का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.