तासगाव : येथील सोमवार पेठ परिसरात मयूर रामचंद्र माळी (वय ३०) याचा डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मृताची आई संगीता रामचंद्र माळी, बहीण काजल रामचंद्र माळी (वय १९) यांना पोलिसांनी (Tasgaon Police) अटक केली. मयूरचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.