सांगली - महापालिका क्षेत्रात २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपायुक्त वैभव विजय साबळे (३१, रा. फ्लॅट क्रमांक ४०३, ग्रीन एकर्स धामणी रस्ता, मूळ रा. सातारा) लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. आज दुपारी झालेल्या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली.