सांगलीचा दहावीचा निकाल 97.22 टक्के 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 July 2020

अखेर जुलै महिना संपता संपता आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 97.22 टक्के लागला. त्यात मुलींनीच बाजी मारली असून मुलींची टक्केवारी 98.42 तर मुलांची टक्केवारी 96.20 आहे. जिल्ह्यातील तब्बल 322 शाळांचा निकाल 100 टक्‍क्‍यांहून अधिक लागला आहे.

सांगली - अखेर जुलै महिना संपता संपता आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 97.22 टक्के लागला. त्यात मुलींनीच बाजी मारली असून मुलींची टक्केवारी 98.42 तर मुलांची टक्केवारी 96.20 आहे. जिल्ह्यातील तब्बल 322 शाळांचा निकाल 100 टक्‍क्‍यांहून अधिक लागला आहे. 

आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. कोरोना संकट काळात तब्बल दीड महिना हा निकाल लांबला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये हुरहुर लागून राहिली होती. त्यातच एका विषयाचा पेपर यंदा झाला नसल्याने त्याचे काय केले जाणार, याविषयी बराच काळ चिंता लागून राहिली होती. अखेर सारे विषय मार्गी लावत बोर्डाने निकाल जाहीर केला आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात निकाल घेत जल्लोष साजरा केला. अर्थात, साऱ्यांनी आपापल्या घरी थांबूनच आनंद व्यक्त केला. 

जिल्ह्यातील 650 शाळांमधील 38 हजार 478 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली होती. त्यात 20 हजार 806 मुलांपैकी 17 हजार 667 मुले तर 17 हजार 667 मुलींपैकी 17 हजार 387 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण 37 हजार 402 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवासातील पहिला मैलाचा दगड पार केला आहे. कडेगाव तालुक्‍याचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.15 टक्के राहिला. आटपाडी ः 97.29, जत ः 96.77, कडेगाव ः 99.15, कवठेमहांकाळ ः 96.51, खानापूर ः 96.93, मिरज ः 96.40, पलू ः 98.87, सांगली ः 96.59, शिराळा ः 97.83, तासगाव ः 96.67 तर वाळवा तालुक्‍याचा निकाल 98.09 टक्के लागला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli district 10 th result is 97.22 %