

Sangli district bank Atpadi branch locker theft
esakal
Sangli Bank Robbery Breaking News : (नागेश गायकवाड) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत अज्ञात चोरट्यांनी खिडकी कापून आत प्रवेश करत स्ट्राँग रूममधील तब्बल २२ लॉकर फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ७ किलो सोने, २० किलो चांदी व मोठी रोकड असा कोट्यवधींचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, ही जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानली जात आहे.