
Sugar Factory Land Auction Sangli : सांगली जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना दत्त इंडिया कंपनीला चालवण्यास दिला आहे. मात्र गेली दोन वर्षे दत्त इंडिया कंपनीने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. बॅँकेने करार मोडून कारखाना ताब्यात घेण्याची नोटीस कंपनीला दिली आहे. दरम्यान, कारखान्याची चार एकर जमीन विक्री करून थकीत ५८ कोटींचे कर्ज वसूल करण्याचा निर्णयही बॅँकेने घेतला आहे. बॅँक संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.