Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
esakal
सांगली : जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी त्याला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले (Sangli District Bank election 2026 latest updates) आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत छाननीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना तूर्त ‘ब्रेक’ लागला आहे. यावर मंगळवारी (ता. १३) निर्णय अपेक्षित आहे. बिनविरोधच्या चर्चेत पडळकरांची उमेदवारी हीच प्रमुख लक्ष्मणरेषा ठरण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत २१ ऑक्टोबरपर्यंत आहे.