Sangli District Bank Election
esakal
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर सात उमेदवारांचे अर्ज अवैध (Suresh Khade nomination form rejected Sangli District Bank election) ठरले. त्यात भाजपचे आमदार सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांचा समावेश आहे. दुसरीकडे खासदार पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख आणि अनिता सगरे यांचे अर्ज वैध ठरल्याने प्रमुख नेत्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय चुरस कायम राहिली आहे.