Jat A Society constituency election
esakal
जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये रविवारी किरकोळ आक्षेप वगळता शांततेत मतदान पार (Sangli District Central Cooperative Bank election) पडले. जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या ‘अ’ सोसायटी गटासाठी दुपारी साडेबारापर्यंत ८८ पैकी सर्व ८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या गटात शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.