Sangli District Bank Election Strategy
esakal
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताब्यात ठेवण्यासाठी आमदार जयंत पाटील ‘अकरा प्लस’चे धोरण राबवत (Sangli District Bank election) आहेत. मित्रपक्षांसह भाजप, शिवसेनेतून कोणाला उमेदवारी देता येईल, याचा विचार केला जात आहे. त्यांचे राजकारण जिल्ह्यातील सर्वांच्या लक्षात आल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. अध्यक्षपदासाठी सख्ख्या चुलत भावाचे नाव पुढे आणल्याची टीकाही त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.