

Political activity intensifies in rural Sangli ahead of district council elections.
sakal
सांगली : नगरपालिका आणि महापालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचे जाहीर केल्याने तब्बल पावणे चार वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नेत्यांना आता जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचे वेध लागले आहेत.