esakal | सांगली जिल्ह्यात 45 वर्षावरील नागरिकांसाठी 18 हजार लस दाखल

बोलून बातमी शोधा

सांगली जिल्ह्यात 45 वर्षावरील नागरिकांसाठी 18 हजार लस दाखल
सांगली जिल्ह्यात 45 वर्षावरील नागरिकांसाठी 18 हजार लस दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील (Sangli Distirct) ४५ वर्षावरील नागरिकांसाठी सरकारकडून पाच दिवसाच्या खंडानंतर आज १८ हजार ४०० लशी (Covid - 19 Vaccine) दाखल झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य भांडारातून तातडीने महापालिकेसह (Corporation) आरोग्य केंद्रांना तातडीने सुरु झाले आहे. दुपारनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. सध्या ४५ वर्षावरील सर्वांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे. सध्या या वयोगटातील नागरिकही नोंदणी करुन लसीसाठी केंद्रावर जात आहेत.

जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपल्याने सलग पाचव्या दिवश लसीकरण (covid-19 vaccine) ठप्प झाले होतो. जिल्‍ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी केवळ १७ हजार ५०० लसी आल्या होत्या. सांगली 2, इस्लामपूर, विटा आणि कवलापूर या पाच ठिकाणी लसीकरण सुरु आहे. त्यांचीही ऑनलाईन नोंदणी (online registration) सध्या होत नाही. लसीचे पोर्टलही बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर