
सांगली : शुक्रवारी (ता. ६) रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने पाच ठिकाणी अन्नछत्र, राहण्याची मोफत सोय केली आहे. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा होतो. यंदा ‘माझा गड-माझी जबाबदारी’चा संदेश देत सोहळा साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातून दहा हजारांवर बांधव उपस्थित राहतील. घरोघरी शिवराज्यभिषेक साजरा करावा, असे आवाहन समितीचे डॉ. संजय पाटील, ‘मराठा समाज’चे माजी अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह सर्वांना केले आहे.