
सांगली : विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत स्थगिती दिली होती. ही मुदत संपल्याने ६ जानेवारी २०२५ पासून सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.