सांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khanapur MLA Anil Babar wife Shobha Babar no more

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेले पंधरा दिवस उपचार सुरू होते.

सांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन

विटा : खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. या दु:खद बातमीमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास निधन झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (khanapur MLA Anil Babar wife Shobha Babar no more)

हेही वाचा: Uday Samant car attack: पुणे पोलिस म्हणतात, सामंतांनी जर आमचं ऐकलं असतं तर..

आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर आजारी असल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यानत त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी दिनानाथ रुग्णालयात अनिल बाबर यांची भेट घेतली होती. यावेळी शिंदे यांनी बाबर यांच्याकडे त्यांच्या पत्नीच्या तब्यतेची विचारपूस केली होती.

Web Title: Sangli District Khanapur Mla Anil Babar Wife Shobha Babar No More Today Morning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..