
Teacher Father Sangli : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजीतील उच्चशिक्षित (?) शिक्षक बापाने खासगी शिकवणी वर्गाच्या सराव चाचणीत गुण कमी मिळाले म्हणून स्वतःच्या मुलीचीच हत्या केली. नुकत्याच झालेल्या ‘फादर्स डे’निमित्त समाजमाध्यमाच्या भिंती शुभेच्छांनी रंगवणाऱ्या याच समाजातील दुर्दैवी घटना बापासोबतच्या वात्सल्याच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उभे करते. हे प्रश्नचिन्ह आजच्या शिक्षण व्यवस्थेवरही उभे राहते. अभ्यास-परीक्षांच्या ताणांमुळे मुलांची होणारी कुत्तरओढ, त्यांच्यात येणारे नैराश्य, त्यातून होणाऱ्या आत्महत्या आणि असे निर्घृण खून आपल्याला शिक्षणाच्या मूळ उद्देशापासूनच दूर नेत आहेत, हे अधिक त्रासदायक आहे.