
सांगली : सांगलीच्या पालकमंत्रिपदी पुन्हा एकदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याकडे लक्ष होते. सातारा जिल्ह्यात चार मंत्रिपदे असल्याने साताऱ्यातील एखादा मंत्री सांगलीचे पालकमंत्री होणार का, याची चर्चा होती. यामध्ये जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांची नावे असल्याची चर्चा होती. मात्र, सांगलीच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहेत. २०१४ ते २०१६ या काळात पाटील सांगलीचे पालकमंत्री राहिले होते.