सांगली जिल्हा युवक कॉंग्रेसने साजरा केला  बेरोजगार दिन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे दोन कोटी युवक बेरोजगार होऊन देशोधडीला लागले आहेत. असा आरोप युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केला.

सांगली : जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. युवक कॉंग्रेस अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले. 

दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे दोन कोटी युवक बेरोजगार होऊन देशोधडीला लागले आहेत. असा आरोप युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केला. याच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. 

ते म्हणाले,""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज साजरा होत असताना देशाचे युवक देशोधडीला लागले आहेत. युवकांना रोजगार नाही. बेरोजगार युवक आत्महत्या आणि अन्य मार्गाचा अवलंब करीत आहेत. देशाच्या युवा पिढीच्या हाताला काम नसल्याने युवा पिढी नैराश्‍याग्रस्त आहे. या युवा पिढीला बेरोजगार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.''

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवक कॉंग्रेसचे मोदींचा वाढदिवस हा बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli District Youth Congress celebrates Unemployment Day