Sangli : ई-पीक नोंदणी केवळ सात टक्केच

वाळवा तालुक्यातील चित्र ॲपसह नोंदणीपासून बहुतांश शेतकरी दोन हात दूर
sangli
sanglisakal
Updated on

इस्लामपूर : वाळवा तालुक्यात केवळ ७ टक्केच खातेदारांनी ई-पीक पाहणी अॅपचा वापर केला आहे. तालुक्यातील १ लाख ५१ हजार ७७७ शेतकरी खातेदारांपैकी ११ हजार ९४५ खातेदारांनी ई-पीक पाहणी ॲपचा वापर केला आहे. ‘माझी शेती-माझा सातबारा’, ‘मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ हे ई-पीक पाहणी ॲप राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठीच केले आहे. परंतु अजूनही बहुतांश शेतकरी यापासून दोन हात दूर आहेत.

दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने हा प्रकल्प काही तालुक्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. त्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. वाळवा तालुक्यातील कृषी सहायक व तलाठी यांच्या माध्यमातून हे मोबाईल अॅप शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याची माहिती देण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.

...अशी होईल ई-पीक पाहणी

शेतकऱ्यांनी स्मार्ट फोनचा वापर कारून ई-पीक पाहणी हे अॅपमध्ये ‘डाऊनलोड’ करावे. या अॅपवर सात-बारावरील नावाप्रमाणे नाव नमूद करावे लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व खाते क्रमांक दिसतील. या प्रक्रियेनंतर ‘ओटीपी’ क्रमांक येईल. तो अॅपमध्ये टाकल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर शेतातील प्रत्येक पिकाचा फोटो अॅपमध्ये ‘अपलोड’ करावा लागेल. त्यात शेतातील विहिरीचाही फोटो पाठवता येणार आहे. हे फोटो तलाठ्याच्या लॉग-इनमध्ये जातील. पीक-पेऱ्यामुळे पुढील हंगामात पीक कर्ज मिळणे सुलभ होईल. आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई, पीकविमाही मिळणे सोपे जाणार आहे.

राज्य शासनाच्या या ई-पीक पाहणी अॅपमुळे चालू पिकाची, विहीर, बोअर यांची अचूक नोंदणी होत आहे. तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. चांगला उपक्रम आहे. परंतु खातेदारांच्यात याबाबत जागरूकता झालेली नाही.

- जयसिंग मोरे, शेतकरी खातेदार, इस्लामपूर

सर्व शेतकऱ्यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाइलमध्ये ई-पीक पाहणी अॅप व्हर्जन-२ ‘डाऊनलोड’ करावे. आपल्या स्वतःच्या शेतातील पिकाची पाहणी करून त्यामध्ये नोंद करावी. एका मोबाइलमध्ये ५० शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी होऊ शकते. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यास ई-पीक नोंदणीसाठी मदत करावी. ई-पीक नोंदणीची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर आहे.

- प्रदीप उबाळे, तहसीलदार, वाळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com