Muslim community prayer in Sangli
esakal
सांगली : देशात सामाजिक सलोखा आणि शांतता राहावी, यासाठी आज समस्त मुस्लिम समाजाकडून दुवा मागण्यात (Sangli Eid Namaz 2026) आली. त्यानंतर बायपास रस्त्यावर ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. ईदगाह मैदानावर काल सकाळी आठ वाजता सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. ईदगाहचे हफिज महंमद यांनी नमाज पठण केले. तर, जामा मशिदीचे हाफिज सदरेआलम यांनी खुदबा पठण केले. त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि स्वीकारल्या. त्यानंतर कुर्बानी दिली गेली.