
सांगली : शेतकरी वधू-वर मेळावा घेऊ
सांगली: शेतकरी नवरा नको, हा विचार अतिशय घातक आहे. तो बदलला पाहिजे. त्यासाठी वीर महिला मंडळाने पुढाकार घ्यावा आणि शेतकरी वधू-वर मेळावा भरवावा, असा ठराव आज मध्यवर्ती समितीच्या अधिवेशनात करण्यात आला. हे समितीचे आठवे अधिवेशन होते. चेअरमन विजया पाटील अध्यक्षस्थानी होत्या. स्वागताध्यक्ष सुजाता शहा यांनी स्वागत केले. सई क्रिएशनच्या रेखा पाटील प्रमुख पाहुण्या होत्या.
आदर्श शाखा पुरस्कार जयसिंगपूर चौथी गल्ली शाखेला देण्यात आला. आदर्श संघनायिका म्हणून सुनीता पाटील (कोल्हापूर), आदर्श कार्यकर्ता पुरस्कार कल्पना पाटील, स्नेहलता जगदेव, आदर्श गृहलक्ष्मी पुरस्कार जयप्रभा पाटील यांना देण्यात आला. रेखा पाटील म्हणाल्या, ‘‘महिलांनी राजकारणात आले पाहिजे, समर्थपणे काम केले पाहिजे. पुरुषांप्रमाणे सर्व क्षेत्र काबीज केली पाहिजेत. नाती सांभाळण्याची जबाबदारी महिलांवरच येऊन पडते, त्यासोबत आता स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारीही उचलली पाहिजे.’’
समितीने शेतकरी वधू-वर मेळावा भरवावा. अन्न व पाण्याची काटकसर करावी. भले दोनपेक्षा जास्त नको, पण दोन अपत्ये असावीत. महिलांनी उद्योगात उडी घ्यावी, असे ठराव करण्यात आले. पदाधिकारी सुवर्णा हुल्ले, सुनीता खंजीरे आदी उपस्थित होते. वनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. १०५ शाखांतील महिला उपस्थित होत्या.
Web Title: Sangli Farmer Bride Groom Meet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..