Panchayat Samiti voter list adjustments
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Panchayat Samiti Elections: तासगाव व वाळवा तालुक्यातील हरकतींवर तहसीलदारांचा निर्णय; मतदारांची नव्याने गणवारी ठरली!
voter list adjustments: ५६ हरकतींपैकी तब्बल ५४ हरकती तहसीलदारांनी मान्य केल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या अंतिम मतदार यादीत मोठे बदल झाले आहेत. मतदारांच्या मागणीनुसार अनेक गणांमध्ये फेरबदल होत नव्या गणांची पुनर्रचना करण्यात आली.
सांगली: जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीची अंतिम मतदार यादी सोमवारी (ता. ३) जाहीर झाली. यादीबाबत दाखल झालेल्या हरकतींवर संबंधित तालुक्यातील तहसीलदारांनी निर्णय घेतला आहे. दाखल झालेल्या ५६ हरकतींपैकी ५४ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत.

