Firecracker Blast
esakal
विटा (सांगली) : भाळवणी (ता. खानापूर) येथील शोभेच्या दारू बनविणाऱ्या पत्र्याच्या शेडला आज सकाळी दहा वाजता शोभेच्या दारूचा भीषण (Firecracker Blast) स्फोट झाला. त्यात आफताब मन्सूर मुल्ला (वय ३०, भाळवणी) व अमीर उमर मुलाणी (वय ४०, चिंचणी - अंबक, ता. कडेगांव) हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा स्फोट आज सकाळी दहाच्या सुमारास झाला.