

Sangli–Miraj–Kupwad Municipal Corporation building amid post-election talks.
sakal
सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा २७ वर्षांचा कारभार पाहिला तर शहराचा विकास सातत्याने दुय्यम राहिला आहे. काही अपवाद वगळले तर कारभारी स्वतःची झोळी भरण्यातच मश्गुल राहिले; पण यावेळी सर्वच पक्षांनी सांगलीचा विकास यावर भरभरून आश्वासने दिली आहेत. म्हणूनच ‘सांगली फर्स्ट’ हा अजेंडा राबवावा.