सांगली : दह्यारीत सापडला ३५ किलोचा मासा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ३५ किलोचा मासा

सांगली : दह्यारीत सापडला ३५ किलोचा मासा!

दुधोंडी : एक-दोन किलोचे वाम, मरळ मासे म्हणजे कृष्णा नदीतील मासेमारांची चैन... पाच-सात किलोचा मासा सापडला तरी जल्लोष करावा, अशी स्थिती... अशावेळी दह्यारीत दोन मासेमारांना तब्बल ३५ किलो वजनाचा कटला मासा सापडला आणि त्यांच्या आनंदाला भरती आली. नदीत एवढा मोठा मासा आढळणे तसे दुर्मिळ आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले.

मच्छीमार अनिल देवळकर व रवींद्र मदने यांना कृष्णा नदी पात्रात मासेमारी करताना कटला जातीचा मासा दह्यारी येथील कृष्णाकाठी सापडला. देवळकर व मदने लहानपणापासून नदीपात्रात मासेमारी करतात. कृष्णा नदी पात्रात माशांच्या अनेक जाती आहेत. शुक्रवारी पहाटे त्यांच्या गळाला हा मोठा मासा लागला आणि त्यांना विश्‍वासच बसेना. हा मासा इतका मोठा होता की या दोघांना नदीपात्रातून काढणे मुश्कील झाले. मासा बाहेर काढल्यानंतर परिसरातून बघ्यांची गर्दी झाली. नदीपात्रात अनेक जातींच्या माशांसह इतरही जलचर प्राणी असल्याने पाणी शुद्ध राहण्यास मदत होत असते. मात्र नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने या जलचर प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. अशावेळी एवढा मोठा मासा सापडणे आमच्यासाठी आश्‍चर्यच असल्याचे मदने यांनी सांगितले.

नदीपात्रात अनेक जातींच्या माशांसह जलचर प्राणी आहेत. कृष्णानदी पात्रात मोठमोठे मासे आहेत. ते सहजासहजी सापडत नाहीत. पहिल्यांदाच इतका मोठा मासा सापडला.

- अनिल देवळकर, मच्छीमार

Web Title: Sangli Fish Found River

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top