Sangli Rain Update : 71 राज्य व जिल्हा मार्ग बंद ; महापुरापेक्षा ही भयानक

जयसिंग कुंभार
Thursday, 15 October 2020

महापुरा पेक्षा ही गंभीर परिस्थिती सध्या तालुक्यात तालुक्यात निर्माण झालेली आहे.

सांगली  :  जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे वीस गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच 71 राज्य व जिल्हा मार्ग बंद ठेवले आहेत.           आज सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील 12 राज्यमार्ग आणि प्रमुख 59 जिल्हा मार्ग असे एकूण 71 मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. या गावांसाठी अन्य पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरु करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात 10 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस झाला त्यानंतर 13 ऑक्टोबर ला एक दिवसाची उसंत घेतली.  

बुधवारी 14 ऑक्टोबरला सकाळी साडेसात वाजता सुरू झालेला पाऊस गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू राहिला. सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यांतही शिराळा व जत तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. सांगली शहरात तर 130 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलेला आहे. अन्य तालुक्यांमध्ये अशीच अवस्था आहे महापुरा पेक्षा ही गंभीर परिस्थिती सध्या तालुक्यात निर्माण झालेली आहे.

 

हेही वाचा- सांगली : बिसूरला पुराचा वेढा ; साडेपाच हजार लोक अडकले -

शहरात पावसाने धुमाकुळ घातला असून जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे. माधवनगर रस्त्यावरील मीरा हौसिंग सोसायटीमध्ये नाल्याचे पाणी शिरले आहे. तसेच नाल्याशेजारील भीमनगर आणि संजय गांधी झोपडपट्टीमध्ये पावसाचे पाणी शिरले. रात्रीपासून अनेक कुटुंबाची तारांबळ उडाली. 

शहरातील जुना बुधगाव रस्ता, कर्नाळ रस्ता, शामरावनगर परिसरातील शेकडो घरांना पाण्याने वेढा दिल्याचे चित्र दिसून येते. तेथील अनेक नागरिकांना घरात पाणी शिरल्यामुळे विस्थापित व्हावे लागले.शहरातील अनेक भागांना तसेच उपनगरातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरले आहे. शहराला जोडणार्‍या ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. आजपर्यंत जेथे पाणी आले नव्हते तिथेही पाणी आल्यामुळे रात्रीपासून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.शेतीचे अतोनात नुकसान झाले असून दुष्काळी भागातून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा- पाऊस उठला शेतकऱ्यांच्या पोटावर ; हातातोंडाशी आलेला घास घेतला हिरावून -

जिल्ल्ह्यात आज सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली. कालचा पाऊस उच्चांकी ठरला. शहरात तब्बल १३४ मिलीमीटर इतका कालचा पाऊस होता. काल तीन राज्यमार्ग आणि पंधरा  जिल्हामार्ग बंद पडले. जत , कवठेमहांकाळ , मिरज पूर्व भागांतून येणाऱ्या रस्त्यावर ओढ्यांचे पाणी आल्याने ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली.  

बुधवारी दिवसभर व आज सकाळी आठ पर्यंतच्या पावसाची नोंद अशी :

मिरज-95
सांगली-136
तासगाव -95
कवठेमंकाळ -95
इस्लामपूर -62
शिराळा -98
कडेगाव -86
पलूस -102
विटा -113
आटपाडी-95
जत-85

 

संपादन - अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli flood information total of 71 roads including 12 state highways and 59 major district roads closed