FDA Action in Sangli : तुकाराम मुंढेंचा दणका! सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या 27 हॉटेल्सना बजावल्या नोटिसा; 3 हॉटेल, एका बेकरीचा परवाना निलंबित

FDA Inspects 40 Food Establishments in Sangli : सांगली जिल्ह्यात एफडीएने ४० अन्न आस्थापनांची तपासणी करून २७ नोटिसा बजावल्या. तीन हॉटेल आणि एका बेकरीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
Sangli FDA food inspection latest news

Sangli FDA food inspection latest news

esakal

Updated on

सांगली : अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यातील ४० अन्न आस्थापनांची तपासणी (Sangli Food Inspection) केली. त्यापैकी २७ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. तीन हॉटेल आणि एका बेकरीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. स्वच्छतेचा अभाव, अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि बंदी असलेल्या पदार्थांचा वापर आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com