
वधूच्या कुटुंबीयांनी वरपक्षाचं भव्य आणि दिव्य पद्धतीने स्वागत केले.
सांगली : आजच्या जमान्यात कोण कशाची हाऊस करतात हे सांगता येत नाही. माणसां प्रमाणेच जनावरांच्यावर जीवापाड प्रेम करणारी अनेक अवलिया आज समाजात आहेत. सांगली येथील गगने कुटुंबीयांनी आपल्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम करताना त्याचा विवाह मोठ्या जल्लोषात साजरा केला. हा विवाह सध्या चर्चेचा ठरला आहे. विशेष म्हणजे या विवाहासाठी मित्रमंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली संजयनगर येथे अक्काताई गगणे कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्री वर मोठे प्रेम आहे. त्यांनी साखरपुडा सह थाटामाटात या दोघांचे लग्न लावून दिले आणि त्याच्यातील प्राण्यावरील प्रेमाचे दर्शन घडवले.या विवाहसोहळ्यात चिरंजीव टायगर आणि वधू चि.सौ.का. डॉली होती. त्यांच्या कुटुंबांनी या दोघांचा साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाणच आलं होतं.
फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं. वधूच्या कुटुंबीयांनी वरपक्षाचं भव्य आणि दिव्य पद्धतीने स्वागत केले. नववधू प्रमाणेच डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. तर वर टायगर रुबाबदार दिसत होता.
हेही वाचा- इस्लामपूरचे नगराध्यक्ष वैयक्तिक प्रश्नातच गुंतून पडलेत -
मोजके विधी केल्यानंतर या दोघांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. त्यानंतर बँडबाजाच्या तालावर टायगर डॉलीची वरात निघाली.या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचत होते. यावेळी मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती. अनेकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन स्नेहभोजनाचा ही आनंद घेतला. प्राण्यावरील प्रेमाचे हे अनोखे दर्शन एका वेगळ्या थाटामाटाने पहावयास मिळाले.
संपादन-अर्चना बनगे